आव्हान चिनी ड्रॅगनचे
पुणे -
ब्रिगेडीअर हेमंत महाजन लिखित 'आव्हान चिनी ड्रॅगन चे ' या संशोधनपर पुस्तकाचे प्रकाशन समारंभ रविवार दि २० ऑक्टो २०१३ रोजी सायंकाळी ६ वाजता पुण्यातील बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सच्या टाटा सभागृहा मध्ये होणार आहे.
भारत सरकारचे माजी गृहसचिव श्री माधव गोडबोले यांच्या हस्ते प्रकाशन होणार असून यावेळी लेफ्टनंट जनरल द. बा. शेकटकर आणि एअर मार्शल भूषण गोखले उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी चीनच्या युद्धामध्ये ज्या शूर सैनिकांनी शौर्य गाजवले अशा सैनिकांचा व त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात येणार आहे . १९६२ चे चिनी आक्रमण, भारत -चीन संबंधाचे आजचे स्वरूप, २०१५-२० साली चीन सोबत युद्ध होईल का अशा विषयांचा उहापोह करण्यात आला आहे.