प्रवास महागला
पुणे - १२ दिवासांवरती दिवाळी येऊन ठेपली असताना खाजगी बसच्या प्रवास भाड्यामध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे. ही भाडेवाढ अकस्मात जरी नसली तरी दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना हवालदिल करणारी नक्कीच आहे. सर्व बाजूंनी भडकलेल्या महागाईच्या भस्मासुरामुळे ही वाढ महत्त्वाची मानली जात आहे.
पुणे-लातूर प्रवास भाडे याआधी निम आराम साठी ४००/- रु आणि स्लीपर साठी ४५०/- रु होते. ते वाढून प्रत्येकी ४५०/- व ५००/- रु झाले आहे आणि या वाढीव भाड्यात अजून दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच पुणे-नागपूर या मार्गावर चालणाऱ्या खाजगी वाहनांचे भाडे देखील कडाडले आहे. सध्या प्रवास भाडे प्रत्येकी १०००-१२००/-रु असून हेच प्रवास भाडे दिवाळी दारम्यान १५००-२५००/- रु प्रती प्रवासी पोचण्याची चिन्हे आहेत.

Post a Comment