मराठी नाव - पिंगळा ,घोगड , घुबड
शास्त्रीय नाव - अथेने ब्रमा इंग्रजी नाव - स्पोटेड आऊलेट
खाद्य - छोटे उंदीर, पाली, सरडे, बेडूक इ .
इतर वैशिष्ट्ये - पिंगळा हा संपूर्ण दक्षिण आशिया खंडात आढळतो. शेती तसेच मानवी वस्ती जवळ रहातो. ह्याने शहरीकरणाशी जुळवून घेतले आहे .
पिंगळा ही घुबडाची सर्वात लहान जात. ह्यांची लांबी सुमारे २१ सेमी लांब असते. पाठीकडील भाग मातकट असून त्या वरील ठिपके पांढरे असतात. पोटाकडील भाग पांढरा असतो. ज्या ठिकाणी अन्न मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल असे ठिकाण घरटे करण्यासाठी निवडले जाते .
झाडाच्या ढोलीत किंवा घर, बिल्डिंगच्या कपारीमध्ये घरटे केले जाते. मादी घरट्यामध्ये तीन ते पाच अंडी घालते. नर मादी दोघे मिळून पिल्लांचे संगोपन करतात
मानवी वस्ती जवळ खाण्याची चंगळ असल्यामुळे हा सुंदर असा पक्षी मानवी वस्तीजवळ नेहमी आढळून येतो .

Post a Comment