गेला मनोहर कुणीकडे
दसरा महोत्सवाला शिवसेनेच्या व्यासपीठावर जे घडले याची साक्षीदार संपूर्ण मुंबई आहे . मनोहर जोशी यांनी केलेल्या पक्ष नेतृत्वावरील टीकेचे पडसाद दसरा महोत्सवात उमटले आणि आपल्याच पक्षाच्या कार्यक्रमातुन,व्यासपीठावरून चालते व्हावे लागले. पक्षातील जेष्ठ नेते भर कार्यक्रमातुन चालते झाले तरी त्यांना कुणी नेत्यांनी थाबवण्याचा प्रयत्न पण केला नाही. हा पाणउतारा पाहून एकच गोष्ट ध्यानात येते कि माणसाला केव्हा आणि कुठे थांबायचे हे जर लक्षात आल नाही तर त्याचे परिणाम किती भयंकर असू शकतात .

Post a Comment