विंडोज ८.१ संगणक प्रणाली लवकरच बाजारात
मायक्रोसोफ्टची नवीन संगणक प्रणाली "विंडोज ८.१" १८ ऑक्टोबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या संगणक प्रणालीचे नाव आधी "विंडोज ब्लू" असे ठेवण्यात आले होते. "विंडोज ८" संगणक प्रणालीच्या वापरकर्त्यांना या संगणक प्रणालीचे उपडेट्स मोफत उपलब्ध होणार आहेत.
"विंडोज ८.१" चा प्रिव्यू वर्जन याआधीच मायक्रोसोफ्टने सादर होता. या प्रिव्यू वर्जनचा अभिप्राय वापरकर्त्यांकडून मागविण्यात होता. सर्व अभिप्रायांवर विचार करून अखेर "विंडोज ८.१" ची निर्मिती करण्यात आली.
विंडोज ८.१ ची काही वैशिष्टे
१. लॉक स्क्रीनवर स्लाईडशो
२. सुधारित बिंग शोधप्रणाली
३ . सुधारित युजर इंटरफेस
४. सुधारित विंडोज स्टोर
५. नवीन वेगवान इंटरनेट एक्स्प्लोरर
.jpg)

Post a Comment